IAS Transfers: राज्यातील IAS अधिकाऱ्यांचा खांदेपालट, वाचा कोणाची बदली कुठे

in #yavatmal2 years ago

IAS Transfers: राज्यातील IAS अधिकाऱ्यांचा खांदेपालट, वाचा कोणाची बदली कुठे
Published on : 30 September 2022, 1:48 am

By
सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील ४४ आयएएस आधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यामुळे राज्यातील अनेक विभागाचा कारभार बदलणार आहे. या बदल्यांमध्ये रोहन घुगे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद, वर्धा ही जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदीप व्यास यांची अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकास पदी बदली करण्यात आली आहे.

संजय खंदारे यांची बदली प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभागात झाली असून अश्विनी जोशी यांना सचिव वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन मंत्रालय, निलेश घटने यांना चिफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर SRA, पुणे येथे बदली देण्यात आली आहे.तसेच मिलिंद म्हैसकर यांना प्रधान सचिव विमान चलन आणि राज्य उत्पादन शुल्क,अनुप कुमार यांना अल्पसंख्यांक सचिव, तर ए. आर. काळे यांच्याकडे अन्न प्रशासन आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे. हर्षदीप कांबळे प्रधान सचिव उद्योग, ऊर्जा कामगार, लीना बनसोडे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास, ठाणे हा पदभार असणार आहे. कौस्तुभ दिवेघावकर हे प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामविकास, पुणे तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दराडे पर्यावरण विभागात सचिव म्हणून काम पाहतील.
RECOMMENDED ARTICLES

आजचे राशिभविष्य - 30 सप्टेंबर 2022
मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
5 hours ago

वरातीमागून आलं घोडं गरब्यावरून नाट्य रंगलं
आपल्या सोसायटीत यंदा गरबा नसल्याचे पाहून जनूभाऊ सकाळीच चिडले. त्यांनी तातडीने अध्यक्ष कारंडे यांचे घर गाठले. अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करण्याची ही चांगली संधी असल्याचे त्यांनी ओळखले. लागोपाठ तीनवेळा त्यांनी घराची बेल वाजवली. पेंगुळलेल्या अवस्थेत कारंडे पुढे आले. दरवाजातून पातेले पुढ
6 hours ago

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 सप्टेंबर 2022
पंचांग -शुक्रवार : आश्‍विन शुद्ध ५, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय सकाळी १०.२१, चंद्रास्त रात्री ९.४२, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२२, ललिता पंचमी, पंचरात्रोत्सवारंभ, भारतीय सौर आश्‍विन ८ शके १९४४.
6 hours ago

स्त्रीआरोग्याचे नऊ मंत्र!

  • डॉ. मालविका तांबेवर्षा ऋतूत वातावरणात कोंदटपणा, दमटपणा, ओलसरपणा दिसून येतो, तसेच ताकदीमध्ये, उत्साहामध्ये कमतरता जाणवत असते. पावसाळ्याच्या शेवटी सूर्यशक्तीचा प्रभाव घेऊन शरद ऋतूचे आगमन होते तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. या ऋतूच्या सुरुवातीला आपण साजरा करतो शारदीय नवरात्र. नवरात्र हा सण असत
    6 hours ago
    हेही वाचा: Rajastan Politics: सोनिया गांधींच्या भेटीनंतर पायलट यांची सामंजस्याची भूमिका, म्हणाले...

पाहा बदल्यांची संपुर्ण यादी..

आधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी पुढीलप्रमाणे. नाव आणि कंसात नव्याने झालेल्या नियुक्तीचे ठिकाण या क्रमाने:१) श्रीमती लीना बनसोड (अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे)२) विवेक जॉन्सन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर)३) डॉ. रामास्वामी एन. (आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्यम, नवी मुंबई)४) अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी, नांदेड)५) डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे (प्रधान सचिव, उद्योग विभाग)६) श्रीमती.जयश्री एस. भोज (डीजीआयपीआर आणि एमडी, महा आयटी कॉर्पोरेशनचा अतिरिक्त कार्यभार)७) परिमल सिंग (प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई.)८) राजेश नार्वेकर (महापालिका आयुक्त नवी-मुंबई महानगरपालिका)९) ए.आर.काळे (आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई)१०) अभिजीत बांगर (ठाणे महापालिका आयुक्त)११) डॉ.विपिन शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई)१२) नीलेश रमेश गटणे, (मुख्य कार्यकारी अधिकारी,एसआरए, पुणे.)१३) सौरभ विजय (सचिव, सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग)१४) मिलिंद बोरीकर (मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ)१५) अविनाश ढाकणे (मॅनेजिंग डायरेक्टर, दादासाहेब फाळके फिल्मनगरी)१६) संजय खंदारे (प्रधान सचिव -१ सार्वजनिक आरोग्य विभाग)१७) डॉ. अनबलगन पी.(अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी)१८) दीपक कपूर, (अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग)१९) श्रीमती. वल्सा नायर (प्रधान सचिव, गृहनिर्माण)२०) श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर (प्रधान सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी, मंत्रालय, मुंबई आणि अतिरिक्त कार्यभार मराठी भाषा विभाग)२१) मिलिंद म्हैसकर (प्रधान सचिव, नागरी विमान वाहतूक, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई आणि अतिरिक्त प्रभार प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क)२२) प्रवीण चिंधू दराडे ( सचिव, पर्यावरण विभाग)२३) तुकाराम मुंढे (आयुक्त एफडब्लू आणि संचालक, एनएचएम, मुंबई)२४) अनुप कुमार यादव, (सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग)२५) डॉ. प्रदीप कुमार व्यास (अतिरिक्त मुख्य सचिव, आदिवासी विकास विभाग)२६) डॉ. अश्विनी जोशी (सचिव, वैद्यकीय शिक्षण)२७) दीपेंद्र सिंह कुशवाह (विकास आयुक्त,उद्योग)२८) अशोक शिनगारे (जिल्हाधिकारी, ठाणे)२९) श्रीमती श्रद्धा जोशी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमडी)३०) मनुज जिंदाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)३१) सचिन ओंबासे (जिल्हाधिकारी, उस्मानाबाद)३२) अमन मित्तल (जिल्हाधिकारी, जळगाव)३३) राजेश पाटील (संचालक, सैनिक कल्याण, पुणे.)३४) श्रीमती आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)३५) कीर्ती किरण एच पुजार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी)३६) रोहन घुगे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा)३७) विकास मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद)३८) श्रीमती वर्षा मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना)३९) के.व्ही.जाधव (संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई)४०) कौस्तुभ दिवेगावकर, (प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास प्रकल्प, पुणे)४१) एम.देवेंद्र सिंग (जिल्हाधिकारी, रत्नागिरी)४२) विवेक एल. भीमनवार (परिवहन आयुक्त)४३) राजेंद्र निंबाळकर (व्यवस्थापकीय संचालक एमएसएसआयडीसी) ४४) डॉ. भगवंतराव नामदेव पाटील (महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका)