Hardik Pandya : सासु सासरे येती घरा तोची दिवाळी दसरा! पांड्याचा आनंद गगनात मावेना...

in #yavatmal2 years ago

Hardik Pandya : सासु सासरे येती घरा तोची दिवाळी दसरा! पांड्याचा आनंद गगनात मावेना...
Published on : 26 September 2022, 12:58 pm

By
किरण महानवर

Hardik Pandya : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या खूप चर्चेत आहे. हार्दिकने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात फिनिशरची भूमिका बजावली. हार्दिकने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारताला सहा विकेटने विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी खिशात घातली. हार्दिक पांड्या त्यावेळेस सोशल मीडियावर दुसऱ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

हार्दिक पांड्याने आता ट्विटरवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक त्याच्या सासूला भेटताना दिसत आहे. हार्दिकने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, व्हिडिओ आणि फोन कॉलनंतर शेवटी भेटलो. नताशाच्या कुटुंबाला पहिल्यांदा भेटणे खूप छान वाटले.
RECOMMENDED ARTICLES

जागर स्त्रीशक्तीचा : महिला स्वयंपूर्णतेच्या ऊर्जेचे प्रतीक बनली पिंक रिक्षा
जळगाव : स्त्रीशक्तीचा जागर म्हणून नवरात्रोत्सव साजरा होतो. या उत्सवातच मराठी प्रतिष्ठानच्या कल्पनेतून, शहरातील दात्यांच्या मदतीतून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा संकल्प सोडण्यात आला. आतापर्यंत पाच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनण्यासाठी ‘पिंक रिक्षा’ने ऊर्जा दिली. जळगाव जनता बँकेच्या
5 hours ago

नवरात्रीसाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळणार? फडणवीसांचे संकेत
मुंबई : राज्यात नवरात्रीच्या उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. यासाठी सुरुवातीचे दोन दिवस बारे वाजेपर्यंत कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण उर्वरित दिवसांसाठी देखील ही मुदत वाढवण्याची मागणी लोकांकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक सं
5 hours ago

Navratri 2022 : या वयाच्या कुमारिकांचे करा पुजन; पुराणात आहे विशेष महत्व
Navratri 2022 : शारदीय नवरात्र उत्सवाच्याकाळात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, दुर्गा देवी यांसह आपल्या कुलदेवते घरोघरी मोठ्या भक्तीभावाने पुजन केले जाते. याकाळात कुमारिकापुजनाला विशेष महत्व आहे. नवरात्राच्या नऊ दिवसांच्या काळात किंवा आपल्या कुळाचाराप्रमाणे कुमारिका पुजन व त्यांना भोजन दे
5 hours ago

Flipkart Sale : iPhone 13 च्या ऑर्डर आपोआप रद्द होतायत? कंपनी म्हणतेय की..
ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन आणि फ्लिपकार्टचा फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना iPhone च्या लेटेस्ट मॉडेल तसेच iPhone 13 वर अनेक चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. सेल दरम्यान, आयफोन 13 ची विक्री देखील झाली. अनेक ग्राहकांनी सेलमध्ये 70 हजार किमतीचे आयफोन 13 देखील 42,
5 hours ago

हेही वाचा: Deepti Sharma : वॉर्निंग देऊनच 'मंकडिंग', अखेर वादावर दिप्ती बोललीच

नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असते. नताशा आणि हार्दिक यांनी 2020 च्या सुरुवातीला लग्न केली. त्यानंतर नताशाने जुलै 2020 मध्ये मुलाला जन्म दिला. हार्दिक आणि नताशा यांनी त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले आहे.नताशा स्टॅनकोविक ही मूळची सर्बियाची असून तिने बॉलिवूड चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. नंतर त्याला खरी ओळख बॉलीवूड गायक बादशाहच्या 'डीजे वाले बाबू...' या सुपरहिट गाण्याने मिळाली. नताशाने बिग बॉस आणि नच बलिए यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला आहे.
हेही वाचा: Sandeep Lamichhane : बलात्काराचा आरोप असलेल्या लामिछानेविरूद्ध इंटरपोलची नोटिस?

हार्दिक पांड्या गेल्या टी-20 विश्वचषकानंतर खराब फॉर्म आणि फिटनेसच्या समस्येमुळे तो जवळपास 5 महिने क्रिकेटपासून दूर होता. हार्दिकने यानंतर आयपीएल 2022 मध्ये स्वतःला सिद्ध केले. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले. नंतर त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे तो भारतीय संघात परतला. हार्दिक पुनरागमन केल्यापासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.