Flipkart Sale : iPhone 13 च्या ऑर्डर आपोआप रद्द होतायत? कंपनी म्हणतेय की..

in #yavatmal2 years ago

Flipkart Sale : iPhone 13 च्या ऑर्डर आपोआप रद्द होतायत? कंपनी म्हणतेय की..
Published on : 26 September 2022, 12:44 pm

By
सकाळ डिजिटल टीम

ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन आणि फ्लिपकार्टचा फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना iPhone च्या लेटेस्ट मॉडेल तसेच iPhone 13 वर अनेक चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. सेल दरम्यान, आयफोन 13 ची विक्री देखील झाली. अनेक ग्राहकांनी सेलमध्ये 70 हजार किमतीचे आयफोन 13 देखील 42,619 रुपयांच्या कमी किमतीत खरेदी केले. मात्र आता आयफोनची ऑर्डर रद्द केल्याने ग्राहक चिंतेत आहेत. फ्लिपकार्ट त्यांना न कळवता त्यांच्या ऑर्डर्स रद्द करत असल्याच्या तक्रारी यूजर्स सातत्याने करत आहेत.

फ्लिपकार्टचं म्हणणं काय?या प्रकरणावर अमर उजालाने दिलेल्या रिपोर्टनुसार, फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही नेहमीच ग्राहकांच्या आवडींचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही देशभरात जवळपास 70 टक्के आयफोन ऑर्डर वितरित केल्या आहेत आणि उर्वरित वितरित केल्या जात आहेत. सेलरकडून काही कारणास्तव केवळ 3% ऑर्डर रद्द केल्या आहेत.अपोआप कॅन्सल होतायत ऑर्डरसध्या iPhone 13 (128 GB) Amazon आणि Flipkart या दोन्हींवर स्टॉकमध्ये नाही. केवळ आयफोनचा स्टॉक संपला नाही तर ज्या वापरकर्त्यांनी फ्लिपकार्टवरून आयफोन 13 (128 जीबी) ऑर्डर केली होती त्यांच्यापैकी अनेकांच्या ऑर्डर आपोआप रद्द झाल्या आहेत. यानंतर अनेक युजर्सनी ट्विटरवर फ्लिपकार्टवर टीकाही केली. मात्र, अॅपलने अद्याप या मॉडेलच्या स्टॉकबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. iPhone 13 मध्ये तीन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत, ज्यात 128 GB, 256 GB आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंट आहेत.
RECOMMENDED ARTICLES

Navratri 2022 : या वयाच्या कुमारिकांचे करा पुजन; पुराणात आहे विशेष महत्व
Navratri 2022 : शारदीय नवरात्र उत्सवाच्याकाळात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, दुर्गा देवी यांसह आपल्या कुलदेवते घरोघरी मोठ्या भक्तीभावाने पुजन केले जाते. याकाळात कुमारिकापुजनाला विशेष महत्व आहे. नवरात्राच्या नऊ दिवसांच्या काळात किंवा आपल्या कुळाचाराप्रमाणे कुमारिका पुजन व त्यांना भोजन दे
5 hours ago

हिंजवडीत आयटीत आढळले उदमांजर; प्राणी मित्रांनी सोडले जंगलात
हिंजवडी - भटकंती करता-करता हिंजवडी फेज-३ येथील एका कंपनीच्या कॅन्टीनमध्ये घुसलेल्या उदमांजराला प्राणी मित्रांनी कोणतीही इजा होऊ न देता अलगत शिताफीने पकडुन पौड वन अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार त्याला जंगलात सोडून जीवदान देण्यात आले. रविवारी (ता. २५) रात्री ८. ३० वाजता सर्पमित्र अजित भालेराव यां
5 hours ago

Indian Idol 13: मंचावर गळाभेट घेताना दिसल्या फाल्गुनी-नेहा,भांडण मिटलं?
Falguni Pathak-Neha Kakkar Cold War: फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्या मधील भांडण अखेर मिटल्याचं समोर आलं आहे. आणि हे समोर आलं आहे इंडियन आयडॉल १३ च्या मंचावरील एका व्हिडीओमुळे. म्हणजे हा अंदाज अनेक नेटकरी लावत आहेत बरं का,आम्ही नाही. भांडणानं टोक गाठलं असताना असा व्हिडीओ पाहून आता नेट
5 hours ago

Deepti Sharma : वॉर्निंग देऊनच 'मंकडिंग', अखेर वादावर दिप्ती बोललीच
Deepti Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने शेवटची विकेट मंकडिंग करून काढली. यामुळे भारताने सामना 16 धावांनी जिंकला आणि इंग्लंडला ऐतिहासिक व्हाईट वॉश दिला. दिप्ती शर्माने नॉन स्ट्राईकरवर असलेल्या चार्ली डीनला चेंडू टाकण्यापूर्वीच धाव घेण्यासाठी क्रीज सोडल्यानं
5 hours ago
हेही वाचा: मारुतीची नवीन स्वस्त SUV लॉंच, किंमत पाहून होईल विकत घेण्याची इच्छा

वापरकर्त्यांचा संतापफ्लिपकार्ट सेलच्या नावाखाली फसवणूक करत असून केवळ मार्केटिंगसाठी बनावट सेल दाखवून लोकांना त्रास देत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. अनेक युजर्सनी यासाठी फ्लिपकार्टवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. आयफोन 13 विकत घेतलेल्या अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर फ्लिपकार्टकडे रिफंड आणि ऑर्डर रद्द केल्याबद्दल तक्रार केली आहे.