काँग्रेसच्या हातून राजस्थानही जाण्याची स्थिती; 82 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

in #yavatmal2 years ago

काँग्रेसच्या हातून राजस्थानही जाण्याची स्थिती; 82 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत
Published on : 25 September 2022, 3:22 pm

By
सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 82 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची स्थिती असताना त्यांना विरोध होत असून सरकार कोसळण्याची स्थिती आहे.

हेही वाचा: Ankita Bhandari murder Case: माझं पोरगं साधं भोळं; भाजप नेत्याकडून मुलाचा बचाव

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीपूर्वी होणारी ही बैठक विशेष मानली जात आहे. आज संध्याकाळी राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, धारिवाल यांच्या घरी होणाऱ्या बैठकीचा अजेंडा काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र अशोक गेहलोत यांच्या सर्वात निष्ठावान नेत्याचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्यासाठी ही बैठक होत असल्याची चर्चा आहे.अशोक गेहलोत गटाने त्यांच्या गटातील मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याबाबतचा ठरावही गेहलोत गटाने मंजूर केला आहे. तसेच पक्षाने त्यांचा प्रस्ताव मान्य न केल्यास अशोक गेहलोत गटाचे आमदार आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यामुळे राजस्थानही काँग्रेसच्या हातून जाण्याची शक्यता आहे.
RECOMMENDED ARTICLES

IND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का
IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म
5 hours ago

Nana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, "RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. "
काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.
5 hours ago

Pune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमान
उंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.
6 hours ago

Solapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी
मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
6 hours ago
हेही वाचा: Eknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला

या सर्व प्रकारादरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडू इच्छित नाहीत, या मीडियाने वावड्या उडवून दिल्या आहेत. वास्तविक असं माझ्या मनात कधीच आलं नाही. मात्र राजस्थानमधील पुढची निवडणूक जिंकणे महत्त्वाचं असल्याचं आपण हायकमानला सांगितल्याचं गेहलोत म्हणाले. अशोक गेहलोत गटाचे आमदार आणि विद्यमान सरकारमधील मंत्री गोविंद राम मेघवाल म्हणाले की, अशोक गेहलोत यांनीच मुख्यमंत्री राहावे. पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय आमदारांच्या मतावरच व्हायला हवा, असे दुसरे आमदार सन्यम लोढा यांनी म्हटले नाही. तसे झाले नाही तर सरकारही पडू शकते.