पोलीस विभागात २० हजार पदांची भरती; फडणवीसांची मोठी घोषणा

in #yavatmal2 years ago

पोलीस विभागात २० हजार पदांची भरती; फडणवीसांची मोठी घोषणा
Published on : 26 September 2022, 1:33 pm

By
सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात पोलीस विभागात २० हजार पदांची भरती करणार असल्याची मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर तुरुंग विभागात अमुलाग्र बदल करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. (Recruitment of 20 thousand posts in maharashtra police department announcement by HM Fadnavis)

हेही वाचा: काँग्रेसच्या एकाही नेत्याला पक्षाध्यक्ष व्हायचं नाही पण मुख्यमंत्री व्हायचंय; भाजपचा टोला

फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आम्ही पोलीस भरतीचा निर्णय घेतला असून दोन वर्षांची भरती प्रक्रिया लवकरच हातात घेत आहोत. पोलिसांची सुमारे २० हजार पदं भरण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ८ हजार पोलिसांच्या भरतीची एक जाहीरात यापूर्वी निघाली आहे, पुढे आणखी १२ हजार पोलिसांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध होईल. यामुळं पोलीस दलाला मोठा फायदा होईल"
RECOMMENDED ARTICLES

इनर इंजिनिअरिंग : स्वतःच्या इच्छांशी लढू नका
साधारणपणे गौतम बुद्धांना याचे श्रेय दिले जाते, की त्यांनी इच्छाशून्यतेबद्दल सांगितले. जेव्हा ते म्हणतात, ‘इच्छाशून्यता’; तेव्हा येथे लोक इच्छेशिवाय अस्तित्वात राहू शकतात असे समजण्याइतपत ते मूर्ख नाहीत. त्यांना माहीत आहे, की इच्छेशिवाय अस्तित्व नाही. इच्छाशून्य राहण्याची इच्छा हीच एक मोठी इ
5 hours ago

ओठांच्या वर येणारे केस कसे घालवाल ?
ओठांच्या वर येणारे केस चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवतात. अशावेळी काही घरगुती उपाय करणे आवश्यक असते.
5 hours ago

कोरोनाबाधित मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका! संशोधनातून समोर
कोरोनाव्हायरस संदर्भातील एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे. की कोरोनाची ज्या मुलांना लागन झाली होती त्यामुलांना मधुमेहाचा धोका जास्त आहे. या संशोधनाबाबत दिलेली माहिती 'जामा नेटवर्क ओपन'मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या मुलांवर संशोधन करण्यात आले, ते 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते.
5 hours ago

Navratri 2022: 'ह्या' चित्रपटांनी गाजवली खरी नवरात्र...
6 hours ago
जेल विभागात सुधारणा करणं गरजेचंरेट ऑफ कन्व्हिक्शन वाढलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. तो वाढवण्याच्या दृष्टीनं काय उपायोजना करता येतील तसेच जेल विभागात सुधारणा करणं गरजेचं आहे. सध्या आपल्या जेलमध्ये १,६४१ कैदी असे आहेत ज्यांना जामीन मिळालेला आहे पण जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आणि व्यक्ती नसल्यानं ते तुरुंगातच आहेत. अशा लोकांना जी काही कायदेशीर मदत करता येईल? त्यांना बाहेर कसं काढता येईल? त्यासाठी एनजीओंची मदत घेण्याचा विचार सुरु आहे, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा: Rahul Gandhi : राजस्थानात राजकीय पेच! राहुल गांधी मात्र मुलांसोबत खेळण्यात मग्न

तसेच सायबर सिक्युरिटीबाबत मी आढावा घेतला असून याबाबतचं सायबर सिक्युरिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचा मानसं आहे. फिशिंगमुळं लोकांना विविध फसवणुकींना सामोर जावं लागतं, त्यामुळं सायबर सिक्युरिटीसाठी मोठं कॅम्पेनही आम्ही हाती घेणार आहोत, असंही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.