5G लाँच होताच CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, यामुळे एक...

in #yavatmal2 years ago


5G लाँच होताच CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, यामुळे एक...
Published on : 1 October 2022, 8:10 am

By
सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde On 5G : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतून 5G इंटरनेट सेवा लाँच केली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 5जी च्या लाँचिंगमुळे एक नवीन क्रांति घडणार आहे. सुरुवातीला ही सेवा भारतातील मोजक्याच शहारात सुरू केली जाणार आहे. यात राज्यातील मुंबई, पुणे आणि पनवेल या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

हेही वाचा: 2G to 5G Journey : 27 वर्षांपूर्वीचे 2G ते 5G, असा वाढला भारताचा स्पीड

5G सेवेमुळे इंटरनेटचा स्पीड वाढण्यासमदत होणार आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासदेखील मदत होणार आहे. ऑनलाईन ज्या काही सिस्टिम आहेत त्या अपडेट आणि अपग्रेड होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. आपला देश विकासाकडे जात असून यात 5G चे योगदान फार महत्त्वाचे असणार आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.

हेही वाचा: 5G Launch : तुम्हाला 5G साठी मोजावे लागणार एवढे पैसे

भारताच्या विकासात महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास केला जात आहे. यासाठी शेती, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र आणि पायाभूत सुविधा यांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला पाहिजे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मुलं खूप हुशार असल्याचे शिंदेंनी यावेळी सांगितले.