किचन क्वीन मधुरा बिग बॉसमध्ये जाणार? काय दिलं उत्तर

in #yavatmal2 years ago

किचन क्वीन मधुरा बिग बॉसमध्ये जाणार? काय दिलं उत्तर
Published on : 26 September 2022, 3:13 pm

By
सकाळ डिजिटल टीम

मधुराज रेसीपी हा महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ बनवायला शिकवणारा चॅनल आहे. मधुरा बाचल यांनी 2009 मध्ये मोठी झेप घेतली, त्यांनी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांना जगभर पोहचवण्यासाठी पहिले YouTube चॅनल सुरू केले. मधुराजच्या मराठी YouTube चॅनेलवर 6.5 मिलीयन पेक्ष अधिक सबस्क्राइबर्स मिळवले आहेत. तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, 7 मिलीयनहून अधिक लोक मधुराज रेसिपी फॉलो करतात.

कोणतीही आयडिया नसताना ही मधुराने येवढ्या मोठ्या यशापर्यंत मजल मारली आहे. चॅनल सुरू केल्यानंतर पहिला व्हिडिओ हा 'भरलं वांग' रेसिपी हा होता. आणि त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. सोबतच व्हिडीओला चांगल्या प्रकारे फीडबॅक मिळाला होता. या कामत कोणाचा सपोर्ट आहे असं विचारल असता त्यांनी सांगितल की. घरच्याचा चांगला सपोर्ट मिळतो,आणि अजूनही आई सपोर्ट करत असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील महिलांसोबत पुरुषांचा देखील व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.मधुराज रेसिपी हे पहिले मराठी YouTube चॅनल आहे. ज्याचे 6.5 मिलीयन सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला आहे. या चॅनेलमध्ये एक हजार पेक्षा जास्त रेसिपींचे व्हिडीओ आहेत. या रेसिपींचे बहुतांशी व्हिडीओ महाराष्ट्रीयन असले तरी, मधुराने आंतरराष्ट्रीय रेसिपन पासून ते देसी स्ट्रीट फूडपर्यंत तुम्ही कल्पना करू शकनार नाही. अशा सगळ्या डिशचे व्हिडीओ बनवले आहेत. मधुरा रेसिपीचे व्हिडीओ पाहून कोणीही कधीही स्वयंपाक बनवू शकतो!
RECOMMENDED ARTICLES

ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख बदलली! आता 'या' तारखेला होणार मतदान
मुंबई : राज्यातील विविध १८ जिल्ह्यांच्या ८२ तालुक्यांमधील ११६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान होईल; तर मतमोजणी १४ ऑक्टोबर ऐवजी आता १७ ऑक्टोबरला होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
5 hours ago

दैनंदिन गुणवत्ता फेरीद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीच्या प्रवेशाची संधी
पुणे - राज्यात इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सध्या १२ हजार ६८४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नसल्याचे दिसून येते. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे ‘सतत विशेष फेरी’ (दैनंदिन गुणवत्ता फेरी) म
5 hours ago

पुणे : पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांचा पोलिसांकडून कसुन शोध सुरु
पुणे - पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या प्रकरणामध्ये सायबर फॉरेन्सीक तपासासाठी व्हिडीओ पुरावे पाठविण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. एकीकडे तांत्रिक तपास सुरु असतानाच दुसरीकडे, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. राष्ट्रीय तपास स
5 hours ago

लक्ष्मणसह 'या' दिग्गजांच्या नशिबात एकही World Cup सामना नव्हता
देशाकडून खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचे वर्ल्डकप खेळणे हे स्वप्न असते.
5 hours ago

मधुराजला बिग बॉस मध्ये जायला आवडेल का या प्रश्नावर मधुरा म्हणाल्या "मला बिग बॉस मध्ये जायला नक्कीच अवडेल, का नाही आवडणार टेलिव्हिजन हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे. तेथील वेगवेगळ्या माणसांसोबत राहून काही नवीन गोष्टी शिकायला आवडतील."मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपीज शेअर करणे मधुराजचे नेहमीच उद्दिष्ट आहे. खरं तर, ती भारतातील एकमेव त्रिभाषिक रेसिपी बनवायला शिकवणारा मधुराज रेसीपी हा YouTube चॅनल आहे. मधुराजने अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ जतन करण्याच्या उद्देशाने “अंगत पंगत” ही अत्यंत लोकप्रिय संकल्पना आणली. करोनाच्या काळात जग थांबले होते आणि त्या काळात प्रत्येकजण होम-शेफ बनला आहे, त्यामुळे मधुराजची रेसिपी घराघरात पोहचली.