Apple कंपनीने चीनपेक्षा टाटावर दाखवला विश्वास, भारतात बनणार 'मेड इन इंडिया आयफोन'

in #yavatmal2 years ago

नवी दिल्लीः भारत हे स्मार्टफोनचे मोठे मार्केट बनले आहे. जगभरातील दिग्गज टेक कंपन्या आता चीनला कंटाळल्या आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांची चीनपेक्षा भारताला पसंती मिळत आहे. भारतात वाढत असलेला स्मार्टफोनच्या व्यापारात आता टाटा ग्रुपची (Tata Group) एन्ट्री होणार आहे. याप्रकरणी आता टाटा ग्रुपची भारतात आयफोन बनवणारी कंपनी Wistron Corp शी चर्चा सुरू आहे. या पार्टनरशीपमध्ये Tata Group iPhone बनवणार आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, टाटा ग्रुप (Tata Group) तायवानच्या कंपनीचे अधिग्रहन करण्यासाठी आयफोन प्रोडक्शनचे मॅन्यूफॅक्चरिंग वाढवणार आहे.चीनकडून Apple चा अपेक्षाभंग
चीनमध्ये कोविडची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अजूनही अनेक ठिकाणी लॉकडाउन सारखी परिस्थिती आहे. त्यामुळे व्यापार करताना कंपन्यांना त्रास होत आहे. याच कारणामुळे कंपनी चीनमधून आपला व्यवसाय शिफ्ट करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे भारताला सर्वात जास प्राधान्य आहे. कंपनी चीनमधून भारतात जवळपास ३ लाख ७० हजार यूनिट आयफोनचे शिपमेंट करायचे आहे. जे २०२२ मध्ये ५ लाख ७० हजार युनिट होवू शकतात. सोबत चीनच्या तुलनेत भारतात लेबर कॉस्ट कमी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कंपनी भारतात आपल्या tata-and-iphone-94366023.jpgप्रोडक्ट्सचे निर्माण करणार आहे.

Sort:  

You are Great!
& Best news updater