T20 Rankings: बाबर आझमला सूर्यकुमारपासून धोका, एशिया कप स्पर्धेतच घेणार बदला

in #yavatmal2 years ago

एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) आता सुपर 4 चा थरार सुरु होईल. चार अव्वल टीम एकमेकांना भिडतील. त्यानंतर ठरेल एशियाची चॅम्पियन टीम. पण त्याआधी क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी बातमी. पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) कर्णधार आणि सलामीचा फलंदाज बाबर आझमला टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवपासून धोका निर्माण झालाय.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत (T20I Batting Rankings) बाबर आझमने (Babar Azam) आपलं अव्वल स्थान अबाधित ठेवलं आहे. पण आता त्याचं हे स्थान धोक्यात आलं आहे. याला कारण आहे टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच फॉर्मात असून एशिया कप स्पर्धेतच सूर्यकुमार बाबर आझमचा नंबर वनचं स्थान हिसकावून घेऊ शकतो.