Loan Settlement करण्यापूर्वी ही बातमी एकदा वाचा, जाणून घ्या नफा आणि तोटा

in #yavatmal2 years ago

तसं पाहिलं तर कर्ज घेण्याचं कोणचीही इच्छा नसते. पण काही वैयक्तिक कारणांमुळे कर्ज घेण्याची वेळ येते. कर्ज घेतल्यानंतर व्याजाचा डोंगर डोक्यावर असतो. अनेकदा काही कारणांमुळे कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडता येत नाही. त्यामुळे बँक कर्जाच्या हफ्त्यासाठी तुमच्या पाठी तगदा लावते. तुम्ही तुमच्या कर्जाचे हफ्ते सलग 91 दिवस न केल्यास बँक नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) म्हणून वर्गीकृत करते. तुमच्या विनंतीनंतर, बँक तुम्हाला वन टाईम सेटलमेंट (OTS) ऑफर करते. OTS मध्ये, डिफॉल्टरला प्रिंसिपल अमाउंट पूर्ण भरावी लागते. व्याजाची रक्कम आणि दंड आणि इतर शुल्क अंशतः किंवा पूर्णपणे माफ केले जाते. काही प्रकरणांमध्ये, मूळ रकमेमध्ये काही सूट देखील दिली जाते. पण बँकेने दिलेला हा पर्याय निवडावा का? त्याबद्दल येथे जाणून घ्या.