पुन्हा आला मौका! आज Ind vs Pak हायव्होल्टेज सामना! कोण कोणावर पडेल भारी, कशी असेल खेळी?

in #yavatmal2 years ago

आजचा दिवस भारतीय क्रिकेट रसिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात भिडणार आहे.

सुपर फोरला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान आणि हॉगकाँगला नमवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मनोबल उंचावले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी संघ देखील जोमात आहे.

भारताविरोधात पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला असला तरी; हॉगकाँगला नमवल्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास देखील दुनावला आहे.