Anand Mahindra यांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ; पोस्टमध्ये लिहिलं 'खरं आहे...'

in #yavatmal2 years ago

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सर्वेसर्वा आणि उद्योगपती आनंद महिंद्र सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सर्वसामान्य नेटकऱ्यांशी संवाद साधतात. त्यांनी शेअर केलेले प्रेरणादायी व्हिडीओ नेटकऱ्यांचा उत्साह द्विगुणित करतात. त्यामुळे त्यांच्या पोस्टकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओत वेगवेगळी हस्ताक्षरांची शैली दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओवर आनंद महिंद्रा यांनी सूचक कॅप्शनही लिहिली आहे.