चिमुरड्याला चावा, मालकीण बघ्याच्या भूमिकेत... Video पाहून लोकांचा संताप

in #yavatmal2 years ago

सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Video) सध्या चांगलाच व्हायरल झाला असून या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीजवळच असलेल्या गाझिजाबादमधल्या (Ghaziabad) या व्हिडिओने लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे. हा व्हिडिओ नंदग्राम क्षेत्रातल्या राजननर एक्सटेंशन चार्म्स काउंटी सोसायटीतला (Charms Castle, Rajnagar Extension) आहे. सोसायटीतल्या लिफ्टमधला (Lift) हा व्हिडिओ असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक महिला आपल्या पाळीव कुत्र्याला (pet dog) घेऊन सोसायटीतल्या लिफ्टमध्ये शिरते. लिफ्टमध्ये एक चिमुरडा शाळेची बॅग पाठिला लावून मागे उभा असल्याचं या व्हिडिओत दिसंतय. तो मुलगा लिफ्टच्या दिशेने जात असतानाच कुत्र्याने हल्ला करत त्याचा चावा घेतला.

कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तो मुलगा अक्षरश: व्हिवळत असल्याचं व्हिडिओत दिसतोय. पण यानंतरही त्या कुत्र्याच्या मालकिनीला (Pet Owner) जराही दया आली नाही. तीने आहे त्या जागी उभी राहून केवळ बघ्याची भूमिका घेतली. हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर त्या महिलेविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. हा व्हिडिओ 5 सप्टेंबरचा म्हणजे सोमवारचा असून संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यानची ही घटना आहे.