Vedanta Foxconn : सरकारची अजून हळदही उतरली नाही, मग...रामदास कदमांनी विरोधकांना फटकारले

in #yavatmal2 years ago

राज्यात वेदांता-फोक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरु घमासान माजले आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी विरोधकांना फटकारलं आहे. (Ramdas Kadam Replied To Aditya Thackeray On Vedanta Alligation )शिंदे भाजप सरकार काल आले आहे, अजून शिंदे - फडणवीस सरकारची हळद देखील उतरली नाही. एखादा प्रोजेक्ट जर राज्यातून बाहेर गेला असेल, तर त्यासाठी शिंदे - फडणवीस सरकार कसे कारणीभूत असू शकेल," अशा शब्दात रामदास कदम यांनी विरोधकांना फटकारले आहे.काय म्हणाले रामदास कदम? प्रकल्प बाहेर जाणे हे सर्व महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, इतका मोठा रोजगार देणारा प्रोजेक्ट बाहेर जातो कसा? या बाबतची अधिकची माहिती घेणे गरजेचे आहे, अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करणार असल्याचे कदम यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत सखोल चौकशी करावी, आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. आपण कुठे कमी पडलो, पुन्हा हा प्रकल्प आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलून आणू शकतो का? या विषयावरही आपण चर्चा करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.