Foxconn-Vedanta : महाराष्ट्रातील प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्याचा अद्याप खुलासा नाही - आदित्य ठाकरे

in #yavatmal2 years ago

मुंबई : फॉक्सकॉन-वेदांता सेमीकंडक्टर हा दोन लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला याबाबत अद्याप सरकारकडून कुठलाच अधिकृत खुलासा आलेला नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊ त्यांनी याबाबत काही खुलासेही केले आहेत. तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. (Aditya Thackeray alleged on Shinde Fadnavis govt regarding Vedantta Project)आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला याची माहिती आपल्या सर्वांना कळाली. पण अजूनही यावर या सरकारकडून कुठलाच खुलासा आलेला नाही. १ लाख रोजगार उपलब्ध करुन देणारा प्रोजेक्ट असा दुसऱ्या राज्यात का गेला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्रात यायला तयार होता.