Eकर्करोगाला अधिसूचित आजार घोषीत करा; संसदीय समितीची केंद्राला शिफारस

in #yavatmal2 years ago

नवी दिल्ली : कर्करोगाला अधिसूचित आजार घोषीत करण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संसदीय समितीनं केली आहे. राज्यसभेच्या सभापतींकडे सोमवारी याचा अहवाल सुपूर्द करण्यात आला. कर्करोगाचा अद्याप अधिसूचित आजारात समावेश करण्यात आला नसल्यानं या आजारानं होणाऱ्या मृत्यूंची नोंद योग्य प्रकारे होत नाही. (Cancer should be declared as notified disease says Parliamentary panel) कॅन्सर केअर प्लॅन अँड मॅनेजमेंट, प्रिवेंशन, डाग्नोसिस रिसर्च अँड अॅफोर्डिबिलीटी ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट' वर आधारित १३९ व्या अहवालात ही शिफारस करण्यात आली आहे. समितीनं म्हटलंय की, कर्करोगाला अद्याप अधिसूचीत आजार म्हणून घोषित करण्यात आलेलं नसल्यानं यामुळं होणाऱ्या मृत्यूंची नोंद कमी होत आहे.