भुमरे हा तर गावठी मंत्री, मी त्याला सांभाळलं पण त्याला काहीच कळत नाही"

in #yavatmal2 years ago

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या गटातील आमदारांमध्ये संदीपान भुमरे यांचा सामावेश होता. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच आमदार खैरे यांच्या निशाण्यावर राहिले आहेत. खैरे हा गावठी मंत्री असून त्याला काही कळत नाही असं वक्तव्य खैरे यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना केलं आहे. (Chandrakant Khaire vs Sandipan Bhumare)