नव्या किंगला विशेष सूट! पासपोर्ट, लायसन्सविना करू शकतील प्रवास अन् बरच काही

in #yavatmal2 years ago

नवी दिल्ली - राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्सला यांना ताबडतोब राजा म्हणून घोषित करण्यात आले. ब्रिटनच्या नव्या राजाला मिळणाऱ्या शाही सुविधांची यादी मोठी आहे. पण अशा काही सुविधा आहेत ज्या राजाला अद्वितीय बनवतात. (Princ Charles news in Marathi)
Friday, September 9, 2022
AMP

ताज्या
शहर

|| गणेशोत्सव ||
गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा
ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

नव्या किंगला विशेष सूट! पासपोर्ट, लायसन्सविना करू शकतील प्रवास अन् बरच काही
Published on : 9 September 2022, 11:42 am

By
सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्सला यांना ताबडतोब राजा म्हणून घोषित करण्यात आले. ब्रिटनच्या नव्या राजाला मिळणाऱ्या शाही सुविधांची यादी मोठी आहे. पण अशा काही सुविधा आहेत ज्या राजाला अद्वितीय बनवतात. (Princ Charles news in Marathi)

हेही वाचा: Queen Elizabeth : ब्रिटनचा पुढचा राजा होणार ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स

आता राजा चार्ल्स हे इंग्लंडच्या सर्व म्युट राजहंसांचे मालक असतील आणि ते वर्षातून दोनदा ब्रिटनच्या राजाचा अर्थात स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची परंपराही सुरू करू शकतात.ब्रिटनच्या राजाला मिळणार खास सुविधाराजा चार्ल्स III आता विना पासपोर्ट जगात कुठेही प्रवास करू शकतील. इतर राजघराण्यातील सदस्यांप्रमाणे त्यांना पासपोर्टची गरज भासणार नाही, कारण पासपोर्ट राजाच्या नावाने जारी केला जातो. या कारणामुळेच ब्रिटनमध्ये किंग हा एकमेव व्यक्ती आहे जो परवान्याशिवाय गाडी चालवू शकतो.चार्ल्सची आई महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे दोन वाढदिवस साजरे करण्यात येत होते. पहिला त्यांचा स्वतःचा वास्तविक वाढदिवस होता, जो 21 एप्रिल रोजी एका खाजगी समारंभात साजरा करण्यात येत असे. दुसरा अधिकृत सार्वजनिक कार्यक्रमात साजरा व्हायचा, जो जूनच्या दुसऱ्या मंगळवारी साजरा करण्यात येत होता. या कालावधीत परेडसाठी चांगले हवामान चांगले होते.