दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार अन् तेही शिवसेनेचाच"

in #yavatmal2 years ago

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या उद्धव कदम यांनी ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आणि तेही शिवतीर्थावरच होणार असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.(Shivsena Dasra Melava Updates)मातोश्री हे हिंदुत्वाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मंदिराचा गाभारा आहे. त्याचं महत्व आणि महात्म्य टिकून राहिलं पाहिजे. कारण मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल आणि महाराष्ट्र टिकला तर महाराष्ट्राचं अस्मिता टिकेल म्हणून आम्ही संगनमताने काम करत होतो पण आता आम्ही शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या शिवबंधनामध्ये काम करण्यास आम्ही आलेलो आहोत." असं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या उद्धव कदम यांनी सांगितलं.