दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी पुण्यात घेणार राज्यस्तरीय बैठक; ६ सप्टेंबर रोजी आयोजन

in #yavatmal2 years ago

पुणे : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा गेल्या महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मेटे यांनी अनेक वर्ष संघर्ष केला. मेटे यांच्यानंतर संघटनेची धुरा आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी स्वीकारण्याची शक्यता व्यक्त होत असून ज्योती मेटे पुण्यात राज्यस्तरीय बैठक घेणार आहे. (Jyoti Mete news in Marathi)esakal_new__13_.jpg