Onion Price : कांदा घसरून १४०० रुपये क्विंटलवर

in #yavatmal2 years ago

नाशिक : कर्नाटक-आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी उशिरा केलेली लागवड, राजस्थानमधील नवीन कांद्याची आवक आणि मध्य प्रदेशातील कांद्याची उपलब्धता अशा कारणांमुळे कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याच्या सरासरी भावात क्विंटलला एक हजार ते बाराशे रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांकडून आंदोलनाची ठिणगी लासलगाव बाजार समितीत पडली असून त्यांनी लिलाव रोखले होते. सरकारने ३० रुपये किलो भावाने कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.लासलगावच्या बाजार समितीत गेल्या २१ दिवसांमध्ये ४ लाख ६६ हजार १६४ क्विंटल कांद्याची सरासरी २ हजार १६ रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाली.esakal_new__5_.jpg