Covid-19 XBB Update : नव्या व्हेरियंटचे राज्यात १८ रुग्ण

in #yavatmal2 years ago

मुंबई : राज्यातील इन्साकॉग प्रयोगशाळांच्या ताज्या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये राज्यात एक्सबीबी या व्हेरियंटचे एकूण १८ कोविड रुग्ण आढळले असून त्यात १३ पुणे येथील, नागपूर आणि ठाणे येथील प्रत्येकी दोन; तर अकोला येथील एक आहे. याशिवाय पुण्यातच बीक्यू.१ आणि बीए.२.३.२० या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. हे सर्व रुग्ण २४ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीतील आहेत.sakshi_text_photo__35_.jpg