पाकिस्तान जग जिंकायला निघाले अन् घरच्या मैदानावर इंग्लंडकडून 'बेक्कार' हरले!

in #yavatmal2 years ago

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर हार पत्करावी लागली. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत पाकिस्तानने कमबॅक केले खरे, परंतु इंग्लंडने अखेरच्या दोन ट्वेंटी-२० आपले पत्ते उघडले. दुसऱ्या फळीतील खेळाडूंना पाकिस्तानात दाखल झालेल्या इंग्लंडसमोर हार मानावी लागल्याने बाबर आजम अँड कंपनीवर टीका होतेय. इंग्लंडने ही मालिका ४-३ अशी जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात काही चांगली झाली नाही. फिल सॉल्ट ( २०) व अॅलेक्स हेल्स ( १९) हे सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. कर्णधार बाबरने दोन सोपे झेल टाकल्याने पाकिस्तानसमोर अडचण निर्माण झाली. डेवीड मलान व बेन डकेट यांनी इंग्लंडला सामन्यात कमबॅक करून दिले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. डकेट १९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार मारून ३० धावांवर रन आऊट झाला. त्यानंतर आलेल्या हॅरी ब्रुकने चौथ्या विकेटसाठी मलानसह १०८ धावा चोपल्या. मलानने ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७८ धावा केल्या, तर ब्रुकने २९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह नाबाद ४६ धावा कुटल्या. इंग्लंडने ३ बाद २०९ धावांचा डोंगर उभा केला.

मोहम्मद रिझवान ( १), कर्णधार बाबर ( ४) व इफ्तिकार अहमद ( १९) माघारी परतल्याने पाकिस्तानची अवस्था ३ बाद ३३ झाली होती. शान मसूद व खुशदिल शाह यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला. आदिल राशिदने ही जोडी तोडतानान शाहला २७ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी तंबूत परतण्याची लाईनच लावली. शान मसूदने ४३ चेंडूंत ४ चौकार व १षटकार खेचून ५६ धावांची एकाकी झुंज दिली. पाकिस्तानला २० षटकांत ८ बाद १४२ धावा करता आल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

pakvseng7th_202210891149.jpg

Sort:  

Please sir like my post 😃🙏✨