धारावी पुनर्विकासाचा काय आहे अजेंडा, कशा पद्धतीने होणार पुनर्विकास?

in #yavatmal2 years ago

image.png
सरकार धारावीतील उद्योजकांना अनेक सवलती देणार आहेत. धारावीत सुमारे 15,000 छोटे व्यावसायिक आहेत. ते घरगुती पद्धतीने आपले उद्योग करतात. या सर्व व्यावसायिकांना राज्याच्या जीएसटीचा परतावा पाच वर्ष मिळणार आहे.
सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. गेल्या 18 वर्षांपासून धारावीचा पुनर्विकास रखडलेला होता. त्याने आता महत्वाचा टप्पा पार केला आहे. राज्य सरकारने धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकासचे काम अदानी समूहाला दिले आहे. धारावीचा पुनर्विकास म्हणजे मुंबई झोपडपट्टीमुक्त (Mumbai slum-free)करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले मोठे पाऊल असणार आहे. या प्रकल्पासंदर्भात धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (Dharavi Redevelopment Authority)अध्यक्ष एसआरव्ही श्रीनिवास (SVR Srinivas)यांनी विशेष मुलाखत दिली. dharavi redevelopmentधारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. यामुळे हा जगातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईला झोपडपट्टीमुक्त शहर बनवण्याची स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे, असे श्रीनिवास यांनी सांगितले.