सोने-चांदी पुन्हा महाग, आजचा भाव काय? गुंतवणुकीसाठी मोठी संधी..

in #yavatmal2 years ago


Gold Silver Price : सोन्या-चांदीत आज पुन्हा तेजीचे सत्र राहीले..
नवी दिल्ली : दिवाळीत तज्ज्ञांनी सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) लग्नसराईत फायदेशीर ठरेल असा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसत आहे. सोन्यात जवळपास 5 टक्के तर चांदीच्या किंमतींनी (Silver Price) जवळपास 10 टक्क्यांची उसळी घेतली. येत्या काही दिवसात सोन्याच्या किंमती अजून वधारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामागील कारणे काय आहेत, ते जाणून घेऊयात..