हरी नरके यांची महान शास्त्रज्ञ, भारतरत्न, डॉ.अब्दुल कलाम यांच्याविषयी वादग्रस्त

in #yavatmal2 years ago


या फेसबुक पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. कुणी परखड बोलले असं म्हणत प्रा. नरके यांचं कौतुक केलंय. तर कुणी त्यांच्या टीकेचं खंडन केलंय.
प्रा. हरी नरके (Hari Narke) यांच्या फेसबुक पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांच्या जयंतीनिमित्त देशभरात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. मात्र अब्दुल कलाम यांचं राष्ट्रपती (President) म्हणून देशासाठी काय योगदान आहे, असा सवाल करत प्रा. नरके यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. अब्दुल कलाम खरं तर इंजिनिअर होते, पण त्यांना लोकांनी शास्त्रज्ञ करून टाकलं. मिसाइलचा शोध जर्मनीत लागला, त्यावेळी अब्दुल कलाम पाळण्यात होते. मिसाइल बनवणं हे संशोधन नव्हे, असं वक्तव्य प्रा. हरि नरके यांनी केलंय…