IAS Transfers: राज्यातील IAS अधिकाऱ्यांचा खांदेपालट, वाचा कोणाची बदली कुठे

in #yavatmal2 years ago


मुंबई : राज्यातील ४४ आयएएस आधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यामुळे राज्यातील अनेक विभागाचा कारभार बदलणार आहे. या बदल्यांमध्ये रोहन घुगे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद, वर्धा ही जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदीप व्यास यांची अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकास पदी बदली करण्यात आली आहे.
संजय खंदारे यांची बदली प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभागात झाली असून अश्विनी जोशी यांना सचिव वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन मंत्रालय, निलेश घटने यांना चिफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर SRA, पुणे येथे बदली देण्यात आली आहे.तसेच मिलिंद म्हैसकर यांना प्रधान सचिव विमान चलन आणि राज्य उत्पादन शुल्क,अनुप कुमार यांना अल्पसंख्यांक सचिव, तर ए. आर. काळे यांच्याकडे अन्न प्रशासन आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे. हर्षदीप कांबळे प्रधान सचिव उद्योग, ऊर्जा कामगार, लीना बनसोडे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास, ठाणे हा पदभार असणार आहे. कौस्तुभ दिवेघावकर हे प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामविकास, पुणे तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दराडे पर्यावरण विभागात सचिव म्हणून काम पाहतील.