मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मोकाट बकालेच्या, ३० सप्टेंबरला मोर्चा

in #yavatmal2 years ago


या बाबतीत नाशिकचे आयजी बी जी शेखर यांनी जे पत्र काढलं होतं, त्यातील एकही पुर्तता न झाल्याने सकल मराठा समाजात संताप आहे.
मराठी, जळगाव : जळगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला अटक करा, त्याला पोलीस दलातून निलंबित नव्हे, तर बडतर्फ करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली होती. पण पंधरावाडा उलटूनही किरणकुमार बकालेला अटक करण्यात पोलिसांना अपयश आलं आहे.अखेर मागणीनंतर पोलिसांकडून हालचाल दिसत नसल्याने, जळगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, हा मोर्चा शनिवारी ३० सप्टेंबर रोजी निघणार आहे. या मोर्चात ५० हजार मराठा बांधव सहभागी होतील असा दावा मोर्चाच्या आयोजकांनी केला आहे.या मोर्चाला जिल्हातूनच नव्हे तर राज्यभरातून सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.