अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचे ट्रेलर ‘या’ तारखेला होणार रिलीज…

in #yavatmal2 years ago

Akshya-kumar-1.jpgमुंबई : अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राम सेतू चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट मिळतंय. अक्षयचा हा चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याअगोदर अक्षयने एक खास अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये. यापूर्वी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा चित्रपट (Movie) रक्षाबंधन बाॅक्स आॅफिसवर धमाल करू शकला नाहीये. त्यामुळे अक्षयच्या या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. अक्षयच्या राम सेतू (Ram Setu) या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची क्रेझ आहे.