पंचगंगेत मूर्ती विसर्जन नको; इचलकरंजी महापालिकेने ठोस भूमिका घ्यावी

in #yavatmal2 years ago

इचलकरंजी : पंचगंगेत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई करावी, अशी मागणी आज समता संघर्ष समितीने इचलकरंजी महापालिकेकडे केली. शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन देऊन प्रशासक सुधाकर देशमुख व उपायुक्त प्रदीप ठेंगल यांच्याशी चर्चा केली. मूर्ती दान चळवळ खंडित होऊन पुन्हा नदीचे स्वास्थ्य बिघडेल, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची भूमिका घ्यावी, तसेच शहापूर खाणीत मूर्ती विसर्जित करूया व पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त ठेवूया, अशी ठाम भूमिकाही यावेळी समितीने घेतली. शहराचे सांडपाणी, विविध उद्योगांचे रसायन मिश्रित सांडपाणी यामुळे पंचगंगेचे प्रदूषण होत आहे. त्याचा फटका कावीळ साथीवेळी शहरवासीयांना बसला आहे.Untitled_9.jpg