Vedanta Row : गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे; फडणवीस गरजले

in #yavatmal2 years ago

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Vedanta Row : गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे; फडणवीस गरजले
Published on : 17 September 2022, 2:58 am

By
सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadanvis On Vedanta Foxcon : वेदांता आणि फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यावरून राजकारण तापले आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच हैराण करून सोडले आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या घडामोडींमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. वेदांता गुजरातमध्ये गेला म्हणजे पाकिस्तानला गेला नसून, गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे अशी आठवण त्यांनी विरोधकांना करून दिली आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोणतेही अनुदान घेण्यासाठी 10 टक्के कमिशन द्यावे लागत होते, असा आरोप त्यांनी केला.Devendra_Fadnavis.jpg