Share Market: 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा 'हा' शेअर देईल दमदार नफा.

in #yavatmal2 years ago

कोरोनानंतर प्रवासात वाढ झाल्याने देशांतर्गत टूरिझम इंडस्‍ट्रीही तेजीत आली आहे. मोठ्या हॉटेल्सासोबतच मिड-प्राइस्‍ड हॉटेल सेगमेंटलाही याचा फायदा होतो आहे. अशातच लेमन ट्री होटल्‍स लिमिटेड (Lemon Tree hotels Limited) कंपनीवर फोकस आहे. त्यामुळेच ब्रोकरेज रिसर्च फर्म व्हेंचुराने पोर्टफोलिओमध्ये लेमन ट्रीचे शेअर्स समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. 8 सप्टेंबर 2022 ला शेअरची किंमत 77 रुपयांवर होती. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 91 टक्क्यांहून अधिक वाढ दिसली आहे.