Pramila Jayapal : अमेरिकेत भारतीय वंशाच्या खासदाराला धमकी

in #yavatmal2 years ago

Pramila Jayapal News : अमेरिकेत भारतीयांबद्दल द्वेष वाढत असून गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांवर वर्णद्वेशावरून टिका केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर आता भारतीय वंशाच्या खासदारला धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय-अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. एका व्यक्तीने जयपाल यांनी फोन करून अपशब्द बोलून भारतात परतण्याचा इशारा दिला.
हेही वाचा: Video : दगडूशेठच्या दर्शनाला अजित पवारांच्या खिशात नव्हते पैसे, सुरक्षा रक्षकाने केली मदत

चेन्नईत जन्मलेले खासदार जयपाल यांनी गुरुवारी पाच धमकीचे ऑडिओ संदेश सोशल मीडियावर शेअर केले. ज्यामध्ये अश्लील आणि असभ्य शब्द केले गेले आहेत. या धमकीच्या संदेशात एक व्यक्ती जयपाल यांना गंभीर परिणाम भोगण्याची आणि त्यांच्या मूळ देशात म्हणजेच भारतात परत जाण्याची धमकी देताना ऐकू येत आहे. यानंतर धमकी देणारे संदेश सार्वजनिक करणे आपल्याला योग्य वाटत असल्याचे जयपाल यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.esakal_new___2022_09_09T163633_993.jpg