Eknath Shinde : CM शिंदेंनी 15 मिनिटात मराठवाड्याला दाखवली मोठी स्वप्नं

in #yavatmal2 years ago

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Eknath Shinde : CM शिंदेंनी 15 मिनिटात मराठवाड्याला दाखवली मोठी स्वप्नं
Published on : 17 September 2022, 3:42 am

By
सकाळ डिजिटल टीम

Marathwada Mukti Sangram Day : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज औरंगाबाद येथे मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम पार पडला. औरंगाबादमध्ये या दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याआधी या कार्यक्रमाच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलामुळे वाद निर्माण झाला होता. औरंगाबाद येथील कार्यक्रम केवळ 15 मिनिटांत आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैदराबाद येथील कार्यक्रमाला गेल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. पंधरा मिनिटांच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमात मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठावाड्याच्या विकासासाठी काही मोठी स्वप्न दाखवली आहेत.Eknath_Shinde_PTI1_Final.jpeg