हनुमान जन्मस्थळासाठी पुराणाचा दाखला

in #yavatmal2 years ago

त्र्यंबकेश्‍वर /अंजनेरी (जि. नाशिक) - वाल्मीकी रामायणाच्या आधारे शंकराचार्यांच्या उपस्थितीत किष्किंधा पर्वत हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा कर्नाटकमधील किष्किंधा हनुमान जन्मस्थळ ट्रस्टचे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी केला. तो ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या तीर्थक्षेत्री त्र्यंबकेश्‍वरमध्ये. त्यामुळे हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या अंजनेरीमधील ग्रामस्थ आणि आखाडा परिषद संतप्त झालेत. अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्यासंबंधी स्कंद, ब्रह्म, विष्णू पुराण, नवनाथ ग्रंथ, त्र्यंबक माहात्म्य, संत एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण याचा दाखला देण्यात आला आहे. त्यातून सीमावादाबरोबरच महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटकमधील संघर्षाचा नवा अध्याय सुरु झाल्याचे मानले जात आहे.nashik.jpg