Dasara Melava : जनतेने दसरा मेळाव्याला जाऊच नये; बिग बॉस फेम अभिनेत्याची वादात उडी

in #yavatmal2 years ago

Abhijeet Bichukale On Dasara Melava Row : येत्या काळात मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र, हा दसरा मेळावा नेमका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होणार की उद्धव ठाकरे यांचा याबाबत अद्यापपर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावरील पेच कायम आहे. या सर्व वादात आता बिग बॉस फेस अभिजित बिचुकले यांनीदेखील उडी घेत शिवसेना आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तसेच जनतेने दसरा मेळाव्याच्या सभेला जाऊच नये, असा सल्लाही दिला आहे.esakal_new___2022_09_13T081710_530.jpg