Ganesh Visarjan 2022 : सकाळी सात वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते...

in #yavatmal2 years ago

Friday, September 9, 2022
AMP

ताज्या
शहर

|| गणेशोत्सव ||
गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा
ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Ganesh Visarjan 2022 : सकाळी सात वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते...
Published on : 9 September 2022, 1:48 am

By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मोठ्या जल्लोषात झालेल्या यंदाच्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी पोलिसांकडून शुक्रवारी (ता. ९) व शनिवारी मिरवणूक संपेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी विसर्जन मिरवणुकीमुळे पर्यायी मार्ग असलेल्या ‘रिंग रोड’चा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास यंदाच्या विसर्जन मिरवणूक सुरुवात होईल. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्‍यता पोलिसांनी लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन केले आहे. नागरिकांची सुरक्षितता व सोईच्यादृष्टीने मध्यवर्ती भागातील मिरवणूक मार्गावरील बहुतांश रस्ते शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.esakal_new.jpg