डॅडी' उर्फ अरुण गवळी यांच्या हस्ते 'दगडी चाळ २'चा ट्रेलर आउट..

in #yavatmal2 years ago

Thursday, August 11, 2022
AMP

ताज्या
शहर

मनोरंजन

देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

'डॅडी' उर्फ अरुण गवळी यांच्या हस्ते 'दगडी चाळ २'चा ट्रेलर आउट..
Published on : 11 August 2022, 3:05 am

By
नीलेश अडसूळ

daagdi chaawl : मुंबईतील गॅंगवॉरमधील सर्वात मोठे नाव म्हणजे 'अरुण गुलाब गवळी' उर्फ 'डॅडी'. त्यांच्या 'दगडी चाळी'वर आधारित 'दगडी चाळ' हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केले तसेच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केले. आता पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्रावर राज्य करायला 'दगडी चाळ २' सज्ज झाला असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण ‘रिअल डॅडीं’च्या हस्ते दगड चाळीत झाले असून ट्रेलर पाहून चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले असून रत्नकांत जगताप कार्यकारी निर्माता आहेत. येत्या १९ अॅागस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. (dagdi chawl 2 movie trailer out with presence of real daddy arun gawli in dagadi chawl)WhatsApp_Image_2022_08_10_at_9_53_38_PM(0).jpeg

Sort:  

हमारी खबरों को लाइक करें कमेंट करें और अन्य साथियों की खबरों पर भी लाइक कमेंट अवश्य करें और फॉलो करना नहीं भूले