ओठांच्या वर आणि तोंडाभोवती गडद रंग तुमच्या चेहऱ्याचा लुक खराब करू शकतो

in #yavatmal2 years ago

upper-lip-pigmentation-1-770x436_1667228462402_1667228470573_1667228470573.jpegHome Remedies : ओठांच्या वर आणि तोंडाभोवती गडद रंग तुमच्या चेहऱ्याचा लुक खराब करू शकतो. याची काळजी न घेतल्यास कालांतराने ते डार्क होऊ लागते. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
DIY Hacks to Remove Upper Lip Pigmentation : जर तुमचा चेहरा ग्लोइंग असेल आणि अपर लिपची स्किन डार्क असेल तर चेहरा विचित्र दिसू लागतो. अनेक महिला अपर लिप एरियावर वॅक्स करतात आणि येथे घामही जास्त येतो, त्यामुळे देखील डार्कनेस येतो. पिगमेंटेशन म्हणजे त्वचेवरील काळे डाग किंवा त्वचेच्या एका भागाचा रंग इतर भागापेक्षा गडद असणे. ओठांना गुलाबी करण्यासाठी लोक अनेकदा उपाय करतात, पण आज आम्ही तुम्हाला ओठांवरचे पिगमेंटेशन दूर करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज
केस न कापताही मिळवू शकता स्प्लिट एंड्स पासून सुटका, फक्त लावा या गोष्टी
केस न कापताही मिळवू शकता स्प्लिट एंड्स पासून सुटका, फक्त लावा या गोष्टी

केवळ हार्मोनल बदल नाही तर महिलांच्या या ५ समस्या दूर करते कसूरी मेथी, होतात अनेक फायदे
केवळ हार्मोनल बदल नाही तर महिलांच्या या ५ समस्या दूर करते कसूरी मेथी, होतात अनेक फायदे
पिगमेंटेशन म्हणजे काय?
पिगमेंटेशन म्हणजे त्वचेवरील काळे डाग किंवा त्वचेच्या एका भागाचा रंग इतर भागापेक्षा गडद असणे. त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, ते कालांतराने अधिक गडद होतात. मात्र यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन महागडे पॅकेज घेण्याची गरज नाही. त्यापेक्षा असे अनेक उपाय आपल्या आजींच्या खजिन्यात आहेत, ज्यामुळे अपल लिप पिगमेंटेशनपासून आराम मिळतो.

येथे DIY हॅक आहेत जे अपर लिपवरील डार्क रंग कमी करू शकतात

१. लिंबू आणि साखरने करा स्क्रब

ओठांच्या वरच्या भागावरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि साखरेचा स्क्रब वापरून पाहू शकता. लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड असते ज्यामुळे त्वचेवरील काळेपणा कमी होतो आणि साखर त्वचेला मॉइश्चरायझ करते.

अशा प्रकारे करा वापर

यासाठी एका वाटीत अर्धा लिंबाचा रस व अर्धा चमचा साखर मिक्स करुन ओठांच्या वरच्या भागात हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे मसाज करा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.

२. बटाट्याचा रस अप्रतिम आहे

बटाट्याचा रस नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. म्हणून त्याचा वापर ओठांच्या वरच्या भागातून पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी केला जाऊ शकतो.

अशा प्रकारे करा वापर

ताज्या बटाट्याचा रस एका वाटीत घ्या आणि कापसाच्या मदतीने वरच्या ओठांच्या भागावर लावा आणि सुमारे १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.

३. हळदीमध्ये असतात औषधी गुणधर्म

हळद नेहमीच त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते आणि ओठांच्या वरच्या भागावरील काळे डाग दूर करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.

अशा प्रकारे करा वापर

एक चमचा ताज्या टोमॅटोच्या रसात चिमूटभर हळद मिक्स करा. आता ही पेस्ट प्रभावित भागावर सुमारे १० मिनिटे लावा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.

४. संत्र्याची साल आहे गुणकारी

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. ओठावरील काळेपणा कमी करण्यासाठी संत्र्याची साल प्रभावी ठरते.

अशा प्रकारे करा वापर

अर्धा चमचा संत्र्याच्या सालीची पावडर आणि अर्धा चमचा दही एका वाटीत मिक्स करा आणि ही पेस्ट ओठांच्या वरच्या भागावर लावा आणि सुमारे १५ मिनिटांनी ते सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

(