पारोळ्यात कैरी बाजाराला सुरवात; लोणच्यासाठी ‘सरदार’ला पसंती

in #yavatmal2 years ago

पारोळा (जि. जळगाव) : मागील आठवड्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती (Market Yard) आवारात कैरी (Raw Mango) बाजाराला सुरवात झाली. या रविवारी (ता. १२) काही तुरळक ग्राहकांनी कैरी विकत घेतली. बाजारात बारमासी, राजापुरी, करण, सरदार व गलगप्पा अशा जातीच्या कैरी आल्या आहेत. मात्र, ग्राहकांची लोणच्यासाठी (Pickle) सरदार कैरीला जास्त पसंती दिसून मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या भयावह परिस्थितीमुळे कैरी बाजार बऱ्याच वेळा अमळनेर रस्त्यावर, भोकरबारी शिवारात किंबहुना ज्या ठिकाणी ग्राहक असतील अशा ठिकाणी भरविला जात होता. आता परिस्थिती सुधारली असून शासनाने सर्वत्र मोकळीकतेचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदा कैरी बाजाराचा व्यवसाय चांगला होईल, या आशेने व्यावसायिकांनी मृग नक्षत्रातच कैरी विक्रीस सुरवात केली आहे. मात्र ग्राहकांअभावी व्यापाऱ्यांची कैरी पाहिजे तशी विकली जात नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. पाऊस पडल्यानंतरच कैरीचे लोणचे केले जाते. त्यामुळे येत्या काळात कैरीला अजून मागणी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.आठवडे बाजारातील कैरीचे भाव (प्रतिकिलो)बारामाशी ३० रुपयेराजापुरी ४० रुपयेगलगप्पा ४० रुपयेसरदार ५० रुपयेकरण ५० रुपयेबाजारात मंदीचे कैरी बाजाराला सुरवात झाली असून लोणच्यासाठी लागणारा मालमसाला व इतर साहित्य यांचे दुकाने बाजार समितीच्या आवारात लागतात. मात्र पुरेसे ग्राहक नसल्याने या बाजारातही मंदीचे सावट आहे. यावेळी व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता पावसाअभावी बाजारात मंदी असून यावर्षी चांगला व्यवसाय व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.NSK22G19524.jpg