Rishabh Pant : रोहित शर्माने ऋषभला वगळले पहिली पसंती दिनेश कार्तिकलाच

in #yavatmal2 years ago

Asia Cup 2022 India Vs Pakistan Rishabh Pant : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रोहित शर्माने संघनिवडीवेळी एक मोठा निर्णय घेतला. रोहित शर्माने प्लेईंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) संघात स्थान दिले आहे. दिनेश कार्तिकच आजच्या सामन्यात विकेटकिपिंग करणार आहे.याचबरोबर रोहित शर्माने आपल्या संघात तीन वेगवान गोलंदाज घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग हे तीन वेगवान गोलंदाज आहेत. तर त्यांच्या जोडीला अष्टपैलू हार्दिक पांड्या देखील असणार आहे. याचबरोबर भारत रविंद्र जडेजा आणि युझवेंद्र चहल हे दोन फिरकीपटू घेऊन मैदानात उतरणार आहे.भारताची प्लेईंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग

पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन :

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमान, इफ्तिकार अहमद, खुशदील शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हारीस रौफ, शहानवाज दहानी