दूरदर्शनचा चेहरा हरपला, ज्येष्ठ वृत्तनिवेदन प्रदीप भिडे यांचं निधन

in #yavatmal2 years ago

मुंबई : डीडी सह्याद्रीवरील सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन झाले आहे. भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाल्याची माहिती डीडी सह्याद्रीकडून ट्विटरवर देण्यात आली आहे.दुरदर्शनचा चेहरा ठरलेले प्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे दिर्घ अजारानंतर आज निधन झाले आहे. या बातमीनंतर माध्यम क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या खास आवाजामुळे भिडे हे दुरदर्शनची ओळख बनले होते. विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर प्रदीप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. त्यानंतर ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम पाहिले. त्यांच्या भारदस्त आवाजाच्या जोरावर ते महाराष्ट्रातील घराघरात पोहचले.lsd.jpg