India Cricket team : ‘फायनल फ्रंटियर’च्या आठवणींना उजाळा

in #yavatmal2 years ago

नागपूर : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारतात दाखल झाला असून यावेळी मालिका जिंकायचीच, असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यासाठी सरावासोबत योजना तयार करण्यात आली असून डावपेच आखणे सुरू झाले आहे.
असा निर्धार ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येताना नेहमीच करीत असतो. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना यश मिळतेच, असे नाही. यंदा त्यांच्या मोहिमेला नागपुरातून सुरुवात होत असल्याने २००४-०५ च्या मोसमात जिंकलेल्या कसोटीच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. ‘फायनल फ्रंटियर’ असे संबोधल्या गेलेली ती कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली होती.येत्या ९ तारखेपासून होणारा कसोटी सामना विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेंडियमवर होणार असला तरी ‘तो’ सामना विदर्भ संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर २६ ते ३० ऑक्टोबर २००४ रोजी खेळविला गेला होता.काय घडले होते त्या सामन्यातडॅमियन मार्टिनचे शतक व मायकेल क्लार्कच्या ९१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या प्रथम डावात ३९८ धावा.झहीर खानने चार; तर फिरकीपटू मुरली कार्तिकने ३ बळी.सेहवाग, सचिन, द्रविड, लक्ष्मण असे दिग्गज असतानाही भारतीय संघाचा डाव गिलेस्पी, मॅकग्राच्या माऱ्यापुढे १८५ धावांत गडगडला.ऑस्ट्रेलियाला २१३ धावांची आघाडी.दुसऱ्या डावात सायमन कॅटीच (९९), मार्टिन (९७), क्लार्क (७३) यांनी वेगवान खेळ केला. ऑस्ट्रेलियाने ५ बाद ३२९ धावांवर डाव घोषित.भारतापुढे ५४३ धावांचे अशक्यप्राय आव्हान.
सेहवाग (५८) आपल्या नेहमीच्या शैलीत खेळत होता. त्याच वेळी दुसऱ्या टोकाने दिग्गज पॅव्हेलियनमध्ये परत जात होते.कैफ बाद झाला त्या वेळी भारताची ५ बाद ३७ अशी नाजूक स्थिती.पार्थिव पटेल, अजित आगरकर, अनिल कुंबळे, मुरली कार्तिक व झहीर खान या पाच फलंदाजांनी मिळून १२५ धावांचे योगदान दिले.

rftgyhui.jpg