Hardik Pandya Test : हार्दिक पांड्या आता कसोटी संघात परतणार; काय म्हणाला कर्णधार?

in #yavatmal2 years ago

Hardik Pandya Test : भारताने टी 20 कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड विरूद्धची मालिका 2 - 1 अशी जिंकली. गेल्या काही टी 20 मालिकांमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखीलील भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर भारताच्या वनडे आणि टी 20 संघात पदार्पण केले आहे. मात्र तो कसोटी संघात दिसत नाहीये. मात्र आता चाहते त्याला कसोटी संघात देखील पाहू इच्छितात.हार्दिक पांड्याला न्यूझीलंड विरूद्धचा तिसरा टी 20 सामना जिंकल्यानंतर कसोटी संघातील पुनरागमनाबाबत विचारणा झाली. त्यावेळी त्याने एक महत्वपूर्ण अपडेट दिली. पांड्या म्हणाला की, ज्यावेळी मला वाटेल की कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची ही योग्य वेळ आहे त्यावेळी पुनरागमन करणार आहे. सध्या तरी मी पांढऱ्या चेंडूवरील क्रिकेटवर जास्त लक्ष केंद्रित करतोय आणि हे महत्वाचं आहे. जर वेळेनं आणि शरिरानं साथ दिली तर मी कसोटी क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.

हार्दिक पांड्याने न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेत 3 सामन्यात 41 च्या सरासरीने 82 धावा केल्या तर 4 विकेट्स देखील घेतल्या. तर टी 20 मालिकेत कर्णधाराने 33 च्या सरासरीने 66 धावा केल्या. तर 6.72 च्या सरासरीने धावा देत 5 विकेट्स घेत सर्वात यशस्वी गोलंदाज देखील ठरला.हार्दिक पांड्याने भारताकडून 11 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरूद्ध आपली आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द सुरू झाली आहे. पांड्याने शेवटचा कसोटी सामना 2018 मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळला होता. यानंतर त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. यानंतर तो कोणताही कसोटी सामना खेळलेला नाही.

हार्दिक पांड्या सध्या वर्क लोड मॅनेजमेंटमुळे कसोटी खेळू शकत नाहीये. हार्दिक पाठदुखीने त्रस्त होता त्यावेळी तो 2020 आणि 2021 च्या आयपीएल हंगामात एकही षटक टाकू शकला नव्हता. यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपुष्टात आली अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र त्याने 2022 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत पहिले विजेतेपद पटकावून दिले. तो आता गोलंदाजी देखील करत आहे.
image.png