Ganeshotsav 2022 : बाप्पाला आवडणारी गोड अननस-नारळ बर्फी कशी बनवावी पाहा; ट्राय करा

in #yavatmal2 years ago

यंदा ३१ ऑगस्टला बाप्पाचं आगमण होत आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. गणपतीचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवसांत श्रीगणेशाची बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता म्हणून पूजा केली जाते. गणरायाला आवडणारे विविध पदार्थ या दिवसांत त्याला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. (ganeshotsav history and culture)

घरगुती गणपतींचे पाच दिवस आणि सार्वजनिक गणपतींचे अकरा असा सर्वसाधारणपणे गणेशोत्सव साजरा केला जातो. दरम्यान, या दिवसांत बाप्पाला आवडणारे अनेक गोड पदार्थ तुम्ही तयार करत असता. आज आम्ही तुम्हाला घरी सहज बनवता येईल अशी एक खास रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजे अननस खोबऱ्याची बर्फी होय. ही खायला तर चविष्ट आहेच पण बनवायलाही फार वेळ लागत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंच सर्वांना आवडणारी ही बर्फी कशी बनवावी हे आपण पाहुया...
अननस नारळ बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

नारळ - २ कप (किसलेले)

अननसाचे तुकडे - ४ कप

तूप - आवश्यकतेनुसार

साखर - 1 कप

वेलची पावडर - 1 टीस्पून

कृती -

अननस कोकोनट बर्फी बनवण्यासाठी प्रथम नारळ किसून घ्या. यानंतर कढईत तूप, किसलेले खोबरे घालून हलकेसे तळून घ्या. आता याची एकत्र पेस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम अननसाचे तुकडे बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. यानंतर ही तयार पेस्ट नारळ आणि तुपात मिसळा.आता या मिश्रणात साखर टाका आणि नीट मिसळू द्या. यानंतर त्यात वेलची पूड टाका. आता एका प्लेटला चांगले तूप लावून घ्या आणि त्यावर हे मिश्रण काढून घ्या. यानंतर हे हाताने एकसारखे करुन घेत थोडा वेळ थंड होऊ द्या. यानंतर बर्फीचे तुकडे करा. हवे असल्यास बदाम आणि काजू घालून वरून गार्निशिंग करुन सजवू शकता. तुमची अननस कोकोनट बर्फी तयार आहे. तुम्ही ही गोड बर्फी गणपतीला नैवेद्यासाठी दाखवू शकता.