Badminton Tournament : साईप्रणीतचेही आव्हान संपुष्टात

in #yavatmal2 years ago

बँकॉक : थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंकडून निराशा झाली. भारताच्या इतर खेळाडूंचे आव्हान गुरुवारीच संपुष्टात आल्यानंतर बी. साईप्रणीत याच्यावर भारताची मदार होती; पण साईप्रणीतलाही उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. चीनच्या ली शी फेंग याने साईप्रणीतचे कडवे आव्हान तीन गेममध्ये (२१-१७, २१-२३, २१-१८) परतवून लावत उपांत्य फेरीत प्रवेश केला.साईप्रणीतच्या तंदुरुस्तीमुळे त्याला २०२२ मध्ये निराशेला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या या पठ्ठ्याने छान सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये त्याच्याकडे ११-७ अशी आघाडी होती. मात्र विश्रांतीनंतर पुन्हा खेळ सुरू झाला आणि चीनच्या खेळाडूने जबरदस्त खेळ केला. रॅलीच्या खेळावर त्याने वर्चस्व गाजवले. त्याने १४-१५ अशी पिछाडी भरून काढली. त्यानंतर सलग पाच गुण मिळवत पुढे जाऊन २१-१७ असा पहिला गेम जिंकला.दुसऱ्या गेममध्ये साईप्रणीत ३-६ असा पिछाडीवर होता. पण त्यानंतर त्याने आपला खेळ उंचावत ९-९ अशी बरोबरी साधली. पण चीनच्या खेळाडूने तोडीसतोड उत्तरदेत १६-१० अशी आघाडी घेतली. साईप्रणीतने मात्र आपला सर्वोत्तम खेळ करताना हा गेम २३-२१ असा आपल्या खिशात टाकलातिसऱ्या गेममध्येही चुरस पाहायला मिळाली; पण फेंग याने १८-१२ अशी आघाडी घेत लढतीवर शिक्कामोर्तब करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. अखेर २१-१८ असा त्याने गेम जिंकला.
image.png