Ind vs Aus: जडेजा पास! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या करणार फिरकीचा तांडव

in #yavatmal2 years ago

Ind vs Aus Test Ravindra Jadeja : अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमधून पूर्णपणे तंदुरुस्त होत असून आता ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे खेळविण्यात येणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी त्याची भारतीय संघात निवड होणार आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. दुसऱ्या कसोटीत त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.जडेजा गेल्या वर्षी जुलै महिन्यात अखेरचा कसोटी सामना खेळला. भारत-इंग्लंड यांच्यामध्ये हा कसोटी सामना रंगला. त्यानंतर आशिया करंडकादरम्यान जडेजाला दुखापत झाली. ट्वेंटी-२० विश्‍वकरंडकामधूनही त्याला माघार घ्यावी लागली. तिथपासून आतापर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये त्याचे पुनरागमन होणार आहे.भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाने बुधवारी भारताकडे प्रयाण केले. मात्र ऑस्ट्रेलियाचा खेळाडू उस्मान ख्वाजा संघासोबत भारतामध्ये येऊ शकला नाही. व्हिसाच्या विलंबामुळे तो एक दिवस उशिरा भारतात येणार आहे.पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, के. एस. भारत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), रवीचंद्रन अश्‍विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
IMG_20230205_131856.png