सजावटीसाठी घोटावडे बाजारपेठ सज्ज

in #yavatmal2 years ago

भुकूम ता. ३० ः गौरी गणपतीच्या सणासाठी घोटावडे (ता. मुळशी) येथील बाजारपेठ सजली आहे. रिहे खोरेतील गावे व वाड्या वस्त्यांतील ग्रामस्थांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. महिला, मुली व ग्रामस्थांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे, असे स्वाती भेगडे व वैशाली कुंभार यांनी सांगितले. शेळकेवाडी येथे बाजारपेठ असून फुलांच्या, विजेच्या माळा, गणपतीसाठी चौरंग, आरासीचे साहित्य, रांगोळी, उदबत्त्या व पूजेसाठी लागणारे सर्व साहित्याची दुकाने थाटली आहेत. घोटावडे गाव रिहे खोरे व परिसरातील गावांसाठी मध्यवर्ती असून पूर्वी पासून बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे.