आधी बाहुलीला फाशी दिली...मग स्वत: घेतला गळफास, पुण्यात ८ वर्षांच्या मुलाचं कृत्य

in #yavatmal2 years ago

पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आठ वर्षांच्या मुलाने खेळण्यातील बाहुलीला फाशी दिली. बाहुलीला फाशी देण्याआधी त्याने तिच्या तोंडाला कपडा बांधला. यानंतर स्वत:च्या तोंडाला कपडा बांधून लटकवून घेतलं. थेरगावमध्ये हा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

संबंधित कुटुंबीय नेपाळी असून ते एका सोसायटीतील पार्किंगमध्ये वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुलं असून आठ वर्षांचा मुलगा सर्वात मोठा आहे. वडील याच सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. (Pune Police)

मोबाईलमधील व्हिडीओ पाहून मुलाने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. ही घटना घडली त्या वेळी मुलाची आई जवळच सोसायटीत होती. दुर्घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. child_abuse.jpg