बॅंक लुटण्याच्या प्रयत्नातील संशयित ताब्यात

in #yavatmal2 years ago

पाचोरा (जि. जळगाव) : वरखेडी (ता. पाचोरा) येथील महाराष्ट्र बँकेत लुटीचा प्रयत्न करणारा अट्टल घरफोडया (Burglary) जुबेर तडवी (वय २२) याला जळगावच्या गुन्हे शाखेने पहूर बाजारपेठेतून सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. वरखेडी येथील महाराष्ट्र बँकेत लुटीचा प्रयत्न करण्याची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार श्री. बकाले यांनी उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, विनोद पाटील यांचे पथक तयार केले. पथकाने वरखेडी येथील महाराष्ट्र बँक व परिसरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ पाहून संशयिताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता, तो कासली (ता. जामनेर) येथील जुबेर तडवी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याआधारे पोलिसांच्या पथकाने कासली येथे जाऊन शोध घेतला असता, जुबेर हा पहूरच्या बाजारपेठेत असल्याचे समजल्यानंतर त्याला पहूर येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहेNashik_Esakal__89_.png